आमदार दत्तात्रेय भरणे यांनी शालेय विद्यार्थ्यांसमवेत लुटला कबड्डीचा आनंद
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील विविध प्रकारचे कार्यक्रम या ना त्या निमित्ताने होत असतात. या प्रत्येक कार्यक्रमात तालुक्याचे आमदार मा. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित राहत असतात. आणि मा.राज्यमंत्री त्याठिकाणी एक गोड चर्चेचा विषय होतात.
असाच प्रसंग पळसदेव येथील शालेय स्पर्धेतला. एल.जी.बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज स्पर्धेतला . एलजी बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसदेव येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ अंतर्गत वयोगट १४ ते १९ वर्ष मुले व मुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन व श्री.शरदचंद्र पवार साहेब यांच्या खासदार फंडातून उभारलेल्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उद्घाटन झाल्यानंतर कबड्डी स्पर्धेमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी सहभागी होऊन कबड्डीचा खेळ खेळला,यावेळी कबड्डी खेळत असताना दोन गडी बाद ही केले तसेच सर्व मुला-मुलींना प्रोत्साहन म्हणून आमदार भरणे हे स्वतः राजकीय मैदानात रोजच खेळत असतात आज मुलांबरोबर कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला.यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसोडे ,उपाध्यक्ष डॉक्टर शितल कुमार शहा ,कार्याध्यक्ष नंदाताई बनसोडे, पंचायत समिती सदस्य प्रदीप काळे, पळसदेवचे सरपंच इंद्रायणी मोरे व उपसरपंच कैलास भोसले तसेच आजी-माजी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते