इंदापूर तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्य आदर्श – राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे तालुक्यातील मुस्लिम समाजासाठी ७ कोटींचा निधी मंजूर
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.३ : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.आज दिनांक ३ मे रोजी इंदापूर तालुक्यातील सर्व हिंदू मुस्लिम व बौद्ध बांधव ईद निम्मित एकत्र आले होते. आणि सर्वांनी ईद निम्मित शुभेच्छा दिल्या. इंदापूर येथील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव सणानिमित्त एकत्र आले होते.यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
यावेळी ते म्हणाले की , इंदापूर तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्य हे आदर्श आहे. देशातील काही लोक सामाजिक सलोखा बिघडवून पाहत आहे. अश्यात सामाजिक स्वाथ्य बिघडवून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत.
येणाऱ्या भविष्यकाळात तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या निर्माण झालेल्या समस्या आपण सोडवणार आहोत.
आपण इंदापूर तालुक्यातील व शहरातील मुस्लिम बांधवांसाठी सुमारे ७कोटी रुपये निधी मजूर करण्यात आला आहे. यामध्ये ३ कोटी शहरासाठी ३ कोटी रुपये तर ४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत.
यानंतर श्री.भरणे इंदापूर शहरातील एच.के.जे.एन ग्रुप आणि इंदापूर शहर बागवान जमात दर्गाह मस्जीद , तसेच अल तक्वा बॉईज आणि तक्वा सोशल फाउंडेशन टेंभूर्णी नाका इंदापूर आदी ठिकाणी त्यांनी भेट शहरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी इंदापूर शहराचे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष श्री.बाळासाहेब ढवळे तसेच आजी-माजी नगरसेवक , पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.