इंदापूर शहरातील नुकत्याच उद्घाटन झालेल्या पथदिव्यांवर झेंड्यांचे अतिक्रमण तर रस्त्यावर वाहांनाची कोंडी सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

इंदापूर पोलीस नो पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांवर कारवाई करताना

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

दि.१ मे : इंदापूर शहरातील चौकांचे सुशोभीकरण उद्घाटन नुकतेच काही दिवसांपूर्वी खासदार सौ.सुप्रिया सुळे ,राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते झाले आहे. यामुळे शहराच्या वैभवात एक मोठी भर पडली आहे. परंतु या वैभवाला नष्ट करण्याचे काम चालू आहे.

श्री.क्षेत्र निरा नृसिंहपूर विकास आराखड्यातून इंदापूर शहरातील चौक शुशोभिकरणासाठी सुमारे २ कोटी ६७ लाख २१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली असली तरी   काहींनी त्याचे विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केली आहे. इंदापूर शहरातील जुना राष्ट्रीय महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याकारणाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसून येते नाही.

जुन्या राष्ट्रीय महामार्गावर पथ दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून अंधारात असलेला मार्ग प्रकाशमय झाला खरे पण नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठलीच परवानगी न घेता आप आपल्या परीने वेगवेगळे झेंडे लावलेले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाचे बांधकाम अधिकारी याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते आहे. तर जुना राष्ट्रीय महामार्ग रस्ता दुरस्त झाला असला तरी बाबा चौक ते इंदापूर कॉलेज पर्यंतचा रस्ता हा नो पार्किंग असताना देखील लोक चक्क रस्त्यावर गाड्या लावून निवांत शॉपिंगला निघून जातात. परंतु त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही.हे मात्र दुर्दैव! त्यामुळे येणाऱ्या वाहनांना एस. टी बस चालकाला फार मोठ्या मेहनतीने जावे लागते. यावेळी श्री.नारायणदास रामदास हायस्कूलच्या विद्यर्थ्यांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते. मात्र रस्त्यावरील दुचाकी चारचाकी वाहने काही केल्या हटत नाही. इंदापूर पोलिसांनी उभ्या असलेल्या वाहनावर ऑनलाईन चलान पद्धतीने कारवाई केली असली तरीही नागरिक पुन्हा तेथेच गाडी लावतात. नागरिकांना पोलिसांची धास्ती राहिली नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने नो पार्किंगचा बोर्ड लावलेला नाही.त्यामुळे बाहेरून अलेल्या गाड्या देखील पार्किंग केल्या जातात.

त्यामुळे करोडो रुपये सुशोभीकरणासाठी खर्च करून काय उपयोग असा सवाल सुज्ञ नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!