इंदापूर शहरात जश्न- ईद- ए – मिलाद दुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी व शांतेत पार पडली

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क इंदापूर  शिवाजी शिंदे

दि.९: इंदापूर शहरात जश्न- ईद- ए – मिलाद दुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी व शांतेत पार पडली.यावेळी काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये हजारो मुस्लिम बांधव आणि लहान मुले सहभागी झाले होते.

 

कसबा परिसरातून सकाळी १० च्या सुमारास “नारा – ए – तकबीर अल्लाहू अकबर”च्या घोषणात हा जुलूस निघाला.हा जुलूस नेहरू चौक,खडकपुरा, बाबा चौक, मारुती मंदिर, खडकपुरा, शेख मोहल्ला, तेली गल्ली, अशी होत दर्गाह मस्जीद चौकात पोहचली.जुलुसाची सांगता दर्गाह मस्जीदचे इमाम कारी अब्दुल करीम मुशाहीदी यांच्या उपदेशाने करण्यात आली.मुस्लिम बांधवांनी हिरवा , भगवा आणि तिरंगा झेंडे घेऊन व पैगंबरांनी मदिनेत उभारलेल्या मस्जिदे नबवीच्या प्रतिकृतीने इंदापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.मिरवणुकी दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी विविध सामाजिक संघटनांनी चौका- चौकात मुस्लिम बांधवांना मिठाई ,बिस्किटे आणि वस्तूंचे वाटप करण्यात आले. भव्य मिरवणूक सद्भवनेचा संदेश देणारी ठरली.

यावेळी अनेक मान्यवरांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!