प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल इंदापूरात मुस्लिम समाजाकडून बंदची हाक

शिवाजी शिंदे प्रतिनिधी चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

दि. १० : इंदापूर|: नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.१०) इंदापूर शहरातील मुस्लिम समाजाकडून दर्गा मस्जिद चौक ते इंदापूर प्रशासकीय भवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे,पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी बदनामीकारक व खोट्या आशयाचे विधान करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना भडकावून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी असे निवेदनात म्हंटले आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि.११) इंदापूर बंदची हाक मुस्लिम समाजाकडून देण्यात आली आहे.यावेळी शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!