बहुजन समाज पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्रा च्या प्रभारी पदी अजित ठोकळे यांची निवड

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क:

इंदापूर: बसपा चे राष्ट्रीय महासचिव, माजी खासदार, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा.डॉ.अशोक सिद्धार्थ यांच्या अध्यक्षतेखाली, मा.प्रदेश प्रभारी नितीन जाटव साहेब,मा.प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब, मा.प्रदेश अध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज,बुधवारी चेंबूर (मुंबई) येथील बीएसपी भवन येथे राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. मा.डॉ.सिद्धार्थ साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी पदाधिकाऱ्यांना लाभले. सर्वजन सह ‘सर्वजन हित’ हेच ध्येय बीएसपी चे आहे. प्रत्येक कॅडर ने ‘सर्वजण हिताय’ या उद्दिष्टपूर्ती साठी समाजकारण करावे, असे आवाहन मा. डॉ.सिद्धार्थ साहेबांनी केले. प्रदेश कमिटीच्या बैठकीमध्ये प्रदेश सचिव माननीय अजित ठोकळे यांची पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली

बैठकीत सेक्टर प्रभारी डाॅ. हुलगेश चलवादी साहेब मा.प्रा.प्रशांत इंगळे साहेब, मा.ॲड.सुनील डोंगरे साहेब, मा.मनीष कावळे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष मा.चेतन पवार साहेब यांच्या सह प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव , जिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!