भिगवण येथे बसपाची आढावा बैठक संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी :- शिवाजी शिंदे
दि. ११: बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभा मतदारसंघातील जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक भिगवण येथे संपन्न झाली बसपाच्या आढावा बैठकीत बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अजित ठोकळे यांनी संघटनेच्या बळावर विचार मंथन केले. येणाऱ्या काळामध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षाची ताकद व सक्रियता याबाबत मार्गदर्शन केले. केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत राज्यात तील राज्य सरकारच्या धोरणांचा ही विरोध करण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये सरकार विरोधात महागाई तसेच जनहिताच्या कामांसाठी मोठे जन आंदोलन उभा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले प्रत्येक गावातील जनतेशी संवाद साधून त्यांना बसपाच्या समर्थनात आणण्याची रणनीती तयार करण्यात आली
बसपा दलित शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढणारी देशातील एक मात्र पार्टी आहे बहुजन समाज पार्टी हीच देशातील सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकते असे मत पुणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष श्रीपती चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी गणेश भिसे सर भिगवण शहरातील कुंदनकुमार सिंग, चैतन्य रोकडे ,छाया खरात, विद्या जाधव ,सविता सप्ताळे यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी संतोष सवाणे इंदापूर तालुका अध्यक्ष, तसेच मनेश कांबळे उपाध्यक्ष, दिपक सावंत महासचिव, प्रमोद चव्हाण, बामसेफ तालुका अध्यक्ष किरण मिसाळ, संजय चव्हाण,युवराज बनसोडे, सिद्धार्थ लोंढे,संजय जाधव, सागर सवाणे , प्रमोद शेलार माधुरी लोंढे महिला अध्यक्ष इंदापूर तालुका, ताई जगताप, कांता लोंढे, जया निकाळजे, कुमार शेलार, नीलिमा ताई मिसाळ यांच्या सह बसपा चे कार्यकर्ते उपस्थित होते