मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले शहा कुटुंबियांचे सांत्वन…
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील नामांकित कापड व्यापारी व शहा ब्रदर्स मालक, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या मातोश्री व गोकुळदास शहा यांच्या पत्नी शकुंतला (भाभी) गोकुळदास शहा (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या अकलूज येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आसताना त्यांची प्राणज्योत मालवली.
यानंतर गुरूवारी दि.०४ ऑगस्ट रोजी इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शहा इंदापूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत शहा कुटुंबाचे सांत्वन केले. भरणे यांनी शकुंतला (भाभी) शहा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
यावेळी इंदापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, दिलीप वाघमारे, सागर पवार, प्रमोद, राऊत, सचिन देवकर आदी उपस्थित होते.