मा.राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना मातृशोक

 इंदापूर चक्रव्यूह न्यूज प्रतिनिधी:

 

दि.२ जुलै:माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरिजाबाई विठोबा भरणे (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

गिरिजाबाई यांना जिजी असे संबोधले जायचे. जिजिंना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड होती तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एकत्रित कुटुंब टिकवण्यात जिजिंचा मोलाचा वाटा होता. भरणे कुटुंबीयांचा आधारवड असलेल्या जीजी  गेल्या काही दिवसांपासून किरकोळ आजाराने ग्रस्त असल्याने त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य ठीक नव्हते.

दरम्यान शुक्रवारी (दि. १) त्यांनी आपला जीवन प्रवास थांबवला असून भरणे कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्री.दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा यांचे गेल्या दीड वर्षांपूर्वी निधन झाले असून आता आईचे छत्रही हरपल्याने भरणे  आई-वडीलांचे छत्र हरवले आहे. यांच्या पश्चात रामचंद, आबासाहेब, मधुकर व दत्तात्रय ही चार मुले तर साळुबाई, कुसुम व हिराबाई अशा तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान  जिजिंचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. काल दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार भरणेवाडी येथे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!