राज्यमंत्री भरणे यांचे इफ्तार पार्टीत लहान मुलांसोबत हितगुज व फोटो शेशनने इंदापूरकरांचे वेधले लक्ष!

इंदापूर शिवाजी शिंदे प्रतिनिधी चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

दि.३०: इंदापूर शहरातील रोजा इफ्तार पार्टीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आले होते. अगदी घाई गडबडीत असताना अचानक काही लहान मुले राज्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले. मंत्री महोदयांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली. आणि लहान मुलांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पण ही लहान मुले काही केल्या तेथून निघेना शेवटी एका मुलाने आम्हाला तुमच्या बरोबर फोटो काढायचे आहेत असं म्हणता क्षणी राज्यमंत्र्यांनी लहान बाळांची इच्छा पूर्ण केली.

पण हे फोटो शेशन येथेच थांबले नाही तर थोरांनी देखील राज्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला.

अशा प्रकारे विशेषतः लहान मुलांमध्ये राज्यमंत्र्यांविषयी फार क्रेझ दिसून आली.लहान मुलांच्या सोबत त्यांनी हितगुज साधले. आणि शेवटी ते एका लहान मुलाच्या ताटामध्येच जेवले.

आणि राज्यमंत्र्यांच्या या साधेपणाचे जनता कौतुक करत होते. आणि त्यांना कुतूहल वाटत होते.राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या लहान मुलांच्या फोटो शेशन ने इंदापूर करांचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!