वाहनांच्या नंबरप्लेट आणि वाहनावर दादा, मामा, पोलीस, पत्रकार असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई

पुणे (इंदापूर /प्रतिनिधी) : वाहनांच्या नंबरप्लेट आणि वाहनावर दादा, मामा, पोलीस, पत्रकार असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच, अनेक जण नंबरप्लेटवर क्रमांकाव्यतिरिक्त दादा, नाना, काका यांसह पोलीस, पत्रकार, व्हीआयपी असेदेखील लिहितात.

मात्र, शासनाने निर्देशित केलेल्या क्रमांकाशिवाय वाहनावर काहीही लिहिणे हा अपराध आहे. तरीदेखील सर्रास अशी वाहने आपल्याला सर्वत्र फिरताना दिसतात. मात्र, आता शहर वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाहनाच्या नंबरप्लेटवर क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. अनेक जण विशिष्ट प्रकारचे क्रमांक घेऊन नंबरप्लेटवर दादा, मामा, काका असे लिहितात. तसेच, नंबरप्लेटवर क्रमांक न टाकता पोलीस, पत्रकार अथवा पक्षाचे चिन्ह टाकतात. अशा वाहनांवर पुणे वाहतूक पोलीस कारवाई करीत असून, पहिल्यांदा पकडल्यावर ५०० आणि दुसर्‍यांदा त्याच वाहनाला पकडले तर १५०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

दरम्यान, पुणे वाहतूक पोलिसांनी ११ ते २१ऑगस्टदरम्यान नियमानुसार नंबर प्लेट नसणार्‍या २८३ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २ लाख २६ हजार ७०० रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला. तसेच भविष्यातदेखील ही कारवाई सुरू राहणार असून, ज्यांची नंबरप्लेट नियमानुसार नाही त्यांनी नियमानुसार करून घ्यावी, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!