वो ग्याराह कौन ? इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीतून ते जाणार भाजपामध्ये? नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू..

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क शिवाजी शिंदे राजकीय वार्ता

इंदापूर प्रतिनिधी

दि.११ :दिल्लीतून बारामती लोकसभा मतदार संघाला आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वोत्त परी प्रयत्न चालू आहेत.पवारांचा बारामती हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पवारांची राजकीय घौड दौड थांबवण्यासाठी व त्यांना त्यांच्याच केंद्रात रोकण्यासाठी  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा मतदार अक्षरशः पिंजून काढला. आणि पुणे जिल्ह्यात असलेल्या सर्व सुख सुविधांचा व समस्यांचा  आढावा घेऊन त्या पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे आणि पवारांच्या  बालेकिल्ल्यातच नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यात राजकीय घडामोडी घडवण्याचे नेटवर्क दिल्लीच्या भवनातून उभरल्याचे  समजते.

सर्व मतदार संघाचा बारकाईने अभ्यास व निरीक्षण करून हव्या असलेल्या कामजोऱ्या शोधून त्यावर दिल्लीत अत्यंत जलद गतीने कामकाज सुरू आहे.यातच निर्मला सीतरामन इंदापूर तालुक्यात आल्या. आणि तालुक्यातील आढावा घेऊन गेल्या.आणि तालुक्यात एक वेगळीच हालचाल सुरू झाली आहे.इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षात बराच नाराज वर्ग असल्याचे बोलले जात आहे.जो अन्य कोणताही मार्ग स्वीकारू शकतात.

त्यातीलच  ११ जण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची येण्याची व आपल्या प्रवेशाची वाट बघत आहे.ज्या अमित शहा यांची येण्याची तारीख निश्चित होईल त्यादिवशी अनेकजण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा नागरिकात चालू आहे.त्यातील एक जण तर म्हणतो की , “मी तालुक्यात फटाक्यांची माळ लावणार! मग बघा दिवाळी कशी साजरी होतेय!

त्यामुळे वो ग्याराह कौन? अशी चर्चा चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!