शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराजा बिर्याणी हाऊसकडून इंदापूरकरांसाठी अनोखा उपक्रम

शिवराज्याभिषेक सोहळयानिमित्त महाराजा बिर्याणीकडून खवय्यांसाठी केला खास उपक्रम

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

: ६ जून हा छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन होय. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्यात अनेक उपक्रम राबविले जातात. अशाच एका शिवप्रेमींनी इंदापूर शहरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराजा बिर्याणी हाऊसतर्फे एकावर एक बिर्याणी फ्री ठेवली गेली होती. त्यामुळे सकाळपासूनच या हॉटेलवर इंदापूरकरांनी तुफान गर्दी केली होती.

याचे नियोजन महाराजाचे चालक श्री. प्रवीण देवकर आणि श्री. आनंद रेडेकर यांनी केले होते. यावेळी त्यांच्याशी विचारपूस करताना ते म्हणाले की, आपण छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तसेच राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. भविष्यात महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी आपण यांच्यापेक्षाही अनोखे कार्यक्रम ठेवणार आहोत तसेच महाराजा बिर्याणी हाऊस खवय्यांसाठी वेगवेगळ्या डिश उपलब्ध करणार आहोत. असे त्यांनी पाक्षिक चक्रव्यूहशी बोलताना त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!