शिवराज्य शेतकरी विकास मंचाकडून रोजा इफ्तार पार्टी
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२४:शिवराज्य शेतकरी विकास मंच याकडून इंदापूर शहरात कसबा या ठिकाणी शुक्रवारी इंदापूर शहरातील सर्व हिंदू- मुस्लीम बांधवांना इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सर्व बांधवांना स्नेह भोजन देण्यात आले होते. शिवराज्य शेतकरी विकास मंच ने घेतलेल्या इफ्तार पार्टीमध्ये इंदापूर शहरातील अनेक नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
शिवराज्य शेतकरी विकास मंच हा सर्व गोरगरीब व सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष असल्याचेही प्रदेश अध्यक्ष जावेद शेख यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला इंदापूर शहरातील दर्गा मस्जिदचे मौलाना व्यंकटेश नगरचे मौलाना तसेच इंदापूर शहरातील नामवंत नागरिक त्याचप्रमाणे इंदापूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज्य शेतकरी विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष पत्रकार जावेद शेख ,शिवराज्य शेतकरी विकास मंच प्रदेश कार्याध्यक्ष वैभव सोनवणे ,शिवराज्य शेतकरी विकास मंच इंदापूर तालुका अध्यक्ष गुणवंत दळवी तसेच पुणे जिल्हा सदस्य किशोर मिसाळ त्याचप्रमाणे सोहेल तांबोळी अली अकबर मनेरी अफजल कुरेशी इनुस मनेरी त्याच प्रमाणे इतर सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.