शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चौकशीचे आदेश .

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

मुंबई: रविवारी पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे.अखेर त्यांनी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने डाव्या बाजून धडक दिली. ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि आम्हाला फरपटत नेलं असं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे. त्यानंतर मी पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही.

तब्बल एका तासानंतर आम्हाला मदत मिळाली असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे.मराठा आरक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने गेली अनेक वर्षे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून योगदान दिले होते.

अपघात नसून घातपात असल्याचा संशय मराठा ठोक क्रांती मोर्चाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यानुसार आठ पथके तयार करण्यात आली आहेत.मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर, मराठा ठोक क्रांती मोर्चाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. यानुसार आठ पथके स्थापन करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय मोहिते, श्वान पथक अपघात स्थळी दाखल झाले आहेत. एसपीजी, आरटीओ अशी आठ पथके तपास करणार आहेत. तपसासाठी एक्स्प्रेस हायवेवरील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेणार आहेत. पोलिसांची दिरंगाई असल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!