शिवसेनेला दे धक्का! मा.खासदार आढळराव पाटील शिंदे गटात सामील!

चक्रव्यूह न्यूज प्रतिनिधी

शिवाजी शिंदे प्रतिनिधी दि.१८: शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला  असून शिवसेनेची गळती काही केल्या थांबेना.

प्रवेश केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने आपण सत्तेत आलो आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली.तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे.  शिरूर मतदार संघात विभाग वाईज सर्व नियोजन करणार आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले. मागील तीन वर्ष सत्ता असून काहीच उपयोग झाला नाही. आता भाजपा बरोबर असल्याने जनतेची कामे करता येईल व विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!