संजीवनी करंदीकर यांच्या निधनामुळे करंदीकर व ठाकरे कुटुंब यांना झालेल्या दुःखात आम्ही सहभागी- हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि: १४: प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे आज पुण्यात निधन झाले.माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी संजीवनी करंदीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून करंदीकर यांच्या_ निधनामुळे करंदीकर व ठाकरे कुटुंब यांना झालेल्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे म्हटले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ संजीवनी करंदीकर यांच्या निधनामुळे ठाकरे व करंदीकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परमेश्वराने त्यांना या दुःखातून सावरण्याची सामर्थ्य व शक्ती द्यावी.