सणसर येथे महाराष्ट्र बँकेने एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यातून १२४वेळा रक्कम कापली!

सणसर येथे महाराष्ट्र बँकेने एकाच दिवशी दोन शेतकऱ्याच्या खात्यातून १२४ वेळा रक्कम कापली! बँकेने पैसे परत न केल्यास बेंकेच्या दारात गाढव बांधून आंदोलन करणार असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.पांडुरंग रायते यांनी दिला आहे.

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

इंदापूर ४: इंदापूर तालुक्यातील सणसर येथे बँक ऑफ महाराष्ट्रने दोन शेतकऱ्यांच्या खात्यातून तब्बल ३७ हजार आणि १२ हजार रुपये असे एकूण ४९ हजार रुपये कट करण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे तालुक्यात याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.बँकेच्या या कृतीने सामान्य माणूस व शेतकरी बुचकळ्यात पडले आहेत .

श्री.अजीज तांबोळी आणि श्री. अरुण रायते अशी बँक खातेधारक शेतकऱ्यांची नावे आहेत.  तांबोळी यांच्या खात्यातून ३६४ रुपये प्रमाणे १०४ वेळा पैसे कापले.अशी एकूण ३७ हजार रुपये बँकेने कट केले तर श्री रायते यांच्या खात्यातून एकच दिवशी २४ वेळा रुपये ३५४ प्रमाणे पैसे कापले. असे १२ हजार रुपये कापले. तांबोळी यांनी बजाज फायनान्स कंपनी कडून ५ लाख रुपये कर्ज घेतले होते.तर रायते यांनी गाडी हप्त्याने घेतली होती. त्यामुळे उसाचे बिल जमा झाल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे दोघांनी या याबाबत अधिक बँकेकडे विचारणा केली असता बँकेने उडवा उडविची उत्तरे दिली व बँकेची चूक नसून फायनान्स कंपनीने हप्ते कट केल्याचे सांगितले.त्यांनतर दोघांनी बजाज फायनान्स कंपनी कडे चौकशी केली असता त्यांनी कुठलाच हप्ता कापला नसल्याचे सांगितले.त्यामुळे या दोघांनी आपण बँकेविरोधत तक्रार करणार असल्याचे सांगितले.त्यामुळे शाखा अधिकाऱ्याने हे पैसे मुंबई मुख्य शाखेने कापले असल्याचे सांगितले.

अशा प्रकारे बँकेने शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत अन्यथा आपण बँकेच्या दरात गाढव बांधून आंदोलन सुरू करू असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.पांडुरंग रायते यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!