साठेनगर, आंबेडकरनगर येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये आनंदाची शिधा किटचे वाटप

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

शिवाजी शिंदे प्रतिनिधी

दि २२: साठेनगर आंबेडकरनगर येथे आनंदाच्या सिधाचे किट वाटप श्री. अनिल ढावरे यांच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये करण्यात आले.त्यामुळे नागरिक खूप आनंदी आहेत.

राज्य सरकारने गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून जरी या कीटची घोषणा केली असली तरी अद्याप काही भागात पोहचली नाही मात्र श्री.ढावरे यांनी वेळोवेळी याचा पाठ पुरवठा करून गरिबांची दिवाळी गोडधोड व्हावी म्हणून प्रयत्न केले अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले.

एकीकडे शहराच्या व तालुक्याच्या अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये हे किट अद्याप पोहचलेला नाही.

आज साठेनगर, आंबेडकरनगर या भागात ढावरे यांच्या प्रयत्नांमुळे या भागात आनंदाची शिधा किटचे वाटप चालू आहेत.

नागरिकांनी श्री. ढावरे यांच्या प्रयत्नाबद्दल नागरिकांनी आभार मानले. नागरिक आपले किट घेऊन जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!