साहेब! २०१४ साली तुमच्याकडे कढीभात खाललाय तो अजून माझ्या ध्यानात आहे – या राज्यमंत्री भरणे यांच्या वाक्याने गडकरी हसू लागले!
साहेब! २०१४ साली तुमच्याकडे कढीभात खाललाय तो अजून माझ्या ध्यानात आहे – या राज्यमंत्री भरणे यांच्या वाक्याने गडकरी हसू लागले!
सोलापूर| प्रतिनिधी चक्रव्यूह |न्यूज नेटवर्क |
दि.२५ मंगळवार: सोलापूर येथील विविध राष्ट्रीय महामार्ग लोकार्पण सोहळा उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आले होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रेय भरणे यांनी २०१४ सालीचा गडकरी यांच्या घरचा कढी भाताचा किस्सा सांगितला आणि सभेत हशा पिकला. स्वतः गडकरी देखील आपले हसू आवरू शकले नाही.
यावेळी श्री. भरणे म्हणाले की,२०१४ साली मी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आम्ही गडकरी साहेबांच्या बंगल्यावर गेलो होतो. आम्ही गडकरींना इंदापूर आणि बारामतीची कामा संदर्भातील पत्रे दिली.तेव्हा गडकरींनी सीआरएफअंतर्गत योजना संपलेली होती.त्यावेळेस नुकताच नवीन आमदार होतो. त्यावेळी कदाचित मी नवीन आमदार असल्याने साहेबांनी इंदापूर मधील रस्त्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर केले.
कढी भाताचा किस्सा सांगताना श्री भरणे म्हणाले की,अजितदादा तेथून निघून गेले.मात्र मला तुम्ही सांगितलं की, असा जावू नकोस, तू जेवण केलेले नाहीस. तू माझ्याकडे कढी भात खाऊन जा असं सांगितलं. त्यामुळे मी तुमच्याकडे कढीभात खाललाय तो अजून माझ्या ध्यानात आहे. असे म्हणताच गडकरी यांना हसू आवरेना आणि सभेत हशा पिकला.
पुढे ते म्हणाले की , या महाराष्ट्राच्या मातीत दोन माणसं प्रेम, जिव्हाळा आणि लावणाऱ्या माणसांपैकी आहेत ती म्हणजे गडकरी साहेब आणि पवार साहेब .तुमच्याकडे अगदी कोणताही साधा कार्यकर्ता आला तरी त्याची विचारपूस करणे व त्याला मदत करण्यासाठी धडपडत असतात.