हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन

  • इंदापूर: प्रतिनिधी दि.१५ मे २०२२

 प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेञ निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.१५) श्री नृसिंहाची पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मंदिर परिसरातील चालू असलेले विकास कामांची पाहणी केली.

  भीमा व नीरा या नद्यांच्या संगमावरती हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वसलेले असून, दक्षिण भारताचे काशी तर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. यावेळी श्री लक्ष्मी नृसिह देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त व पोलीस पाटील अभय वांकर यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान हे कुलदैवत आहे. त्यांनी लक्ष्मी- नृसिंह तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याने या परिसराचा कायापालट झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. चालू वर्षी चांगला पाऊस होऊन, नागरिक-शेतकरी सुखी समाधानी राहू दे, असे साकडे लक्ष्मी-नृसिंह चरणी घातल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयात विजय सरवदे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!