हिंदू मुस्लिम बांधवात दंगली घडवण्यासाठी काही राजकीय लोकांचा प्रयत्न व स्वार्थ – राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे १कोटी २५लाखाचा निधी घोषित केला

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

दि.३० शनिवार :इंदापूर शहरात राष्ट्रवादी पक्षाकडून दर्गाह मस्जीद येथे रोजा इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आला होती. यावेळी राज्यमंत्री श्री. दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस आ जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, इंदापूर शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक उपस्थितीत होते. पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील सर्व मस्जीदचे सर्व मौलाना उपस्थीत होते. श्री भरणे यांच्या हस्ते सर्व मौलानांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. भरणे म्हणाले की, रोजाचा महिना हा मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जातो.मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी मौलाना यांचे फार महत्त्वाचे योगदान असते. नंतर श्री. भरणे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

पुढे ते म्हणाले की, काही राजकीय व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम असा भेद निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.अश्या व्यक्तींपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला. हिंदू मुस्लिम हा एकोपा असाच जपुया.

नंतर श्री.भरणे इंदापूर शहरातील सर्व मस्जिद साठी १कोटी २५ लाख रुपयांचा निधी घोषित केला.सर्व मौलानांचे श्री.भरणे यांनी विकास कामासाठी घडवून आणले. आणि येणाऱ्या भविष्यात मुस्लिम बांधवांसाठी सर्रोवतपरी मदत करण्याचे आश्वासन श्री भरणे यांनी इंदापुकरांना दिले.

श्री. गारटकर म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आपण हा रोजा इफ्तार पार्टी सोहळा आयोजित करत असतो. हिंदू मुस्लिम बांधव सामाजिक सलोखा जपण्याचे काम करत आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव इंदापूर तालुका आहे. कोविड परिस्थितीही श्री.भरणे यांनी आदरणीय शरद पवार व अजिदादांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तालुक्यात अनेक कामे झाली.आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री भरणे यांनी केले. श्री भरणे यांनी अंदाजे १००कोटी रुपयांचा निधी इंदापूर शहराच्या विकासासाठी मंजूर करण्याचा मानस केला आहे.

श्री. गारटकर यांनी भाजपावर व त्यांच्या प्रतिनिधींवर शाब्दिक हल्ला करीत आपण त्यांच्या टीकेला उत्तर विकासाच्या कामातून देवू असे म्हणाले.

यावेळी श्री.भरणे रोजा इफ्तार पार्टीत सहभागी होऊन मुस्लिम बांधवांसोबत स्नेह- भोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!