१९ वर्ष मंत्री राहणाऱ्यांना जातीयवादाचे बीज पेरणे शोभते का ?- पळसदेवच्या सभेत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा श्री. हर्षवर्धन पाटील यांच्यावर घणघाती आरोप
पळसदेव/इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२२: पळसदेव , चांडगाव, लोणी देवकर, कारेवाडी, बिजवडी, वरकुटे बु., करेवाडी, कळाशी, बळपुडी, न्हावी, रुई, कालठण, अगोती, येथील ९७कोटी २४ लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच प्राथमिक शिक्षक सोसायटी नूतन संचालक मंडळ सत्कार समारंभ कार्यक्रम पळसदेव येथे शनिवार दि.२१मे २०२२ रोजी पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रवीण माने, श्री.हनुमंत कोकाटे , श्री.प्रताप पाटील, श्री.महारुद्र पाटील आदी उपस्थित होते.प्रमुख उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, आपण १९ वर्ष मंत्री होता तरी विरोधक जातीयवादाची भाषा करतात हे त्यांना शोभत नाही.विरोधक सांगलीच्या लग्न समारंभात अजितदादांना म्हणाले की इंदापूर तालुक्यात फार मोठा जातीयवाद केला जात आहे ? तुम्ही हे कशासाठी करता ? असा सवाल त्यांनी थेट हर्षवर्धन पाटील यांना श्री.भरणे यांनी केला.
सोलापूरकरांच्या मनात विष पेरण्याचे काम केले गेले आहे.इंदापूर तालुक्यात विरोधकांकडून जातिवादाचे बीज पेरले जात आहे, असा गंभीर आरोप दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.येथे यायचं, खोटंनाटं बोलायचं, जातीपातीचं राजकारण करायचं, दिशाभूल करायची, गोड बोलून गैरसमज निर्माण करायचा हे काम सध्या चालू असल्याची टीका त्यांनी केली. राज्यमंत्री भरणे यांनी सभेत हर्षवर्धन पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटात ९७ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनावेळी पळसदेव येथील जाहीर सभेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची तुफान फटकेबाजी केली.
जिल्हा परिषदेचे मा. आरोग्य व बांधकाम सभापती श्री. प्रवीण माने हे म्हणाले की, आपण सभापती असताना इंदापूर तालुक्यातील अनेक गावांना २६० कोटीच्या आसपास निधी वाटप व विकासाची कामे केली.त्यांनी पळसदेव बिजवडी गटाचे त्यांनी आभार मानले. त्यांनी आपल्या जुन्या मैत्रीच्या आठवणी सांगत मैत्री व राजकारण हे वेगळे असते असे म्हणत आपली व दीपक जाधवांची मैत्री अबाधित असल्याचे सांगितले.
श्री.दीपक जाधव ,श्रीहनुमंत बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.श्री बाळासाहेब काळे पाटील ,श्री.महारुद्र पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.
श्री.श्रीमंत ढोले, श्री.दीपक जाधव,श्री.प्रशांत पाटील, श्री.सचिन सपकळ, व इतर सर्व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आजी- माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन पळसदेव बीजवडी गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मेघराज कुचेकर पाटील यांनी केले.