अन्..आमदार दत्ता भरणे रमले चिमुकल्यांच्या दांडिया महोत्सवात.

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क शिवाजी शिंदे

दि.१ ऑक्टो: मा.राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी इंदापूर येथे १५ वर्षाखालील चिमुकल्यांसोबत दांडिया खेळून त्यांचा आनंद द्विगुणित केला त्यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

आमदार भरणे यांचा स्वभाव अतिशय मन मिळाऊ असल्याने अगदी सहजतेने लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांचा आदर करतात. व त्यांच्यात तेही रमून जातात. त्यामुळे जेथे कोठे असेल तेथे सर्वजण येतात व एकतरी सेल्फी घेतात. त्यामुळे नुसती बाल गोपळातच नाही तर नवं युवक – युवती यांच्यामध्येही आमदार भरणे यांच्याबद्दल क्रेझ दिसून येते. वृद्ध माणसे भरणे यांना आपली आधाराची काठी समजतात. कुठेही तालुक्यात गेले तरी आपले मामा आले असे म्हणत बाल गोपाळ श्री. भरणे यांच्या गाडीची वाट बघत बसतात आणि आले की मामांच्या जवळ पळत जातात. तर काही चिमुकली त्यांना आपले मित्र समजून दिलखुलास गप्पा मारत बसतात.

इंदापूर शहरातील आजचा प्रसंगही असाच काही.राधिका सेवा संस्था इंदापूर यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव मंडळ इंदापूर येथे १५ वर्षाखालील वयोगटामधील लहान मुलांचा दांडिया नृत्य आयोजित करण्यात आला होता यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी लहान चिमूरड्यांसोबत दांडिया खेळून लहान मुलांचा आनंद द्विगुणित झाला यावेळी नगरसेवक अनिकेत वाघ व इंदापूर शहरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!