अहमदनगर जिल्ह्यातून आठवले गटाला गायकवाडांकडून मोठा धक्का! शिवसेनेत केला प्रवेश.
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क/राजकीय वार्ता:
मुंबई (प्रतिनिधी) : आठवले गटाचे माजी प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना जयभीम करत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.त्यामुळे आठवले गटासाठी हा मोठा धक्का समजले जात असून ठाकरेंना याचा फायदा होणार आहे.
अशोक गायकवाड यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे शिवबंधन हाती बांधले आहे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला आहे.
अशोक गायकवाड हे नगर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे आणि बहुजन चळवळीतील जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. त्यांना आठवले यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते, परंतू त्यांच्या या निर्णयाचा तोटा आठवले गटाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गायकवाड हे चळवळीतील नेतृत्व असल्याने त्यांचा लोकांशी दांडगा संपर्क आहे. त्यामुळे आठवले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून ठाकरेंना याचा फायदा होणार आहे.