आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला सावरकर नाव दिल्याने राष्ट्रवादी आक्रमक; थेट शाहू महाराजांच्या नावाने फलक चिटकवले!
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क शिवाजी शिंदे
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा ठराव मुंबई विद्यापीठाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सांगण्यावरून मंजूर केला असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याचा जाहीर निषेध केला आहे.
छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक योगदान पाहता मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोली जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र या वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने या विरोधात आंदोलन करत या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली.
आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतीगृहावर छत्रपती राजर्षी शाहू महाराज आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह नावाचा फलक लावून नामांतर करण्यात आले. राज्यपाल व मुंबई विद्यापीठाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थीकडून निषेध व्यक्त करत यावेळी जोरदार घोषणाबाजीही राष्ट्रवादी कडून करण्यात आली. राष्ट्रवादीच्या या मागणीवर मुंबई विद्यापीठ काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल यांच्यावर जोरदार टाका होत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यानकडून या वक्तवय्याचा निषेध केला जात आहे.