आता वक्फ बोर्डाच्या वक्फ, जमिनीची मोजणीसाठी समिती होणार ?अनेक भूमाफिया गळाला लागणार?
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क:
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील इनामी व वक्फ जमीनीची योग्य माहिती गोळा करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील अनेक जमीनी वर्ग एक मधून वर्ग दोन च्या केल्याने भू-माफियांचे धाबे दणाणले असून त्यांची पळताभुई झाली आहे.तर दुसरीकडे एन-ए प्लॉट खरेदी करणाऱ्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात वक्फ बोर्डाची तसेच इनामी जमीनीचा आकडे वारी मोठी आहे. देवस्थान जमिनींचाही इनामी जमीनीमध्येच सामवेश होतो. ऐतिहासिक काळापासून अनेक देवस्थानकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. मात्र यातील अनेक जमिनी भूमाफीयांनी खरेदी केल्या आहेत. व त्यांची परस्पर विक्री केली आहे.
याच दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमणात वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत. यातील अनेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, तर काहींनी या जमीनीची बेकायदेशीरपणे विक्री झाली आहे. अशा सर्वच जमिनींवर कारवाईची प्रक्रिया जिल्हाधिकारी यांनी सुरू केली आहे. त्यानंतर आता विभागीय आयुक्त कार्यालयातून याबाबात समिती नेमण्याच्या सुचना केल्या आहेत. या समितीकडून शहरासह जिल्ह्यातील वक्फ, इनामी जमीनीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या ठिकाणी अशा जमिनी आहेत, त्याचाही याद्वारे शोध घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून भूमाफियांना हादरा
शहरासह जिल्ह्यातील काही जमिनी काही भूमाफियांनी बेकादेशीरपणे आपल्या नावावर तर काही हस्तांतरीत केल्या आहेत. गेल्या ५० वर्षाच्या काळात अनेक मातब्बर भूमाफिया मोठे झाले आहेत. याला प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही साथ मिळालेली आहे. मात्र जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत योग्य भूमिका घेऊन बेकायदेशीरपणे वर्ग एक केलेल्या सर्व जमिनी वर्ग दोनमध्ये रुपांतरीत केल्या आहेत.याचा दणका भूमाफियांना बसला आहे. तसा याचा फटका सर्वसामान्य प्लॉट खरेदी केलेल्या नागरिकांना बसला आहे.
बडे मासे गळाला लागणार!
यातील काही भूमाफीयांना स्वतःचे हित साधले आहे. त्यामुळे ज्यांनी अशा देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या नावे करून घेतल्या आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच ज्या अधिकाऱ्यांनी याबाबात शासनाची दिशाभूल केली, अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्व सामन्य वर्ग व भविकातून होत आहे.