दि.२१फेब्रु: एम.पी.एस.सी.च्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज बालगंधर्व चौक येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. माजी सामान्य प्रशासन राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.