इंदापूरकरांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाची केली जय्यत तयारी
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.१३ : ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये,संस्था, शैक्षिणक संस्था आदींनी जय्यत तयारी केली आहे.
ठिक-ठिकाणी रंग रांगोटी , विविध प्रकारचे घोष वाक्य असलेली फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत.शालेय संस्थांनी इंदापूर शहरातून फेऱ्या काढल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी घोष वाक्य देण्यात आली.यामुळे शहरातील वातावरण आनंदमय दिसून येत आहे.इंदापूर शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज दिसून येत आहे.
उजनी धरणावर १६ दरवाजे उघडण्यात आले असून त्यावर जलसंपदा विभागाकडून तिरंगाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.