इंदापूर तालुक्यात श्रावण बाळ योजना,संजय गांधी निराधार अनुदान योजना व विविध योजनेंतर्गत १० हजार ३६० लाभार्थी योजेनेचा घेताहेत लाभ
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२८ गुरुवार : इंदापूर तालुक्यात संजय गांधी योजना शाखे अंतर्गत माहे मार्च २०२२ अखेर १० हजार ३६०लाभार्थी लाभ घेत आहेत. त्यामुळे अनेक तालुक्यातील लाभार्थी याचा लाभ घेत आहेत. अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसिलदार सौ. पी.बी. वैकर यांनी दिली.
एकूण आठ योजना राबवल्या जातात.
१.संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी संख्या- २१९६
२. संजय गांधी निराधार अनुदान योजना (मागासवर्गीय लाभार्थी संख्या )- २४०
३.श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थी संख्या- ४६२९
४.श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना(मागासवर्गीय लाभार्थी संख्या) – ७८७
५.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ वेतन योजना लाभार्थी संख्या – २३८९
६.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना लाभार्थी संख्या -९९
७.इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग वेतन योजना लाभार्थी संख्या -११
८. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना लाभार्थी संख्या -०९
एकूण आठ योजनांचे लाभार्थी संख्या १०हजार ३६०
संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चे अध्यक्ष श्री.सागर दशरथ मिसाळ व सदस्य ,गट विकास अधिकारी श्री.विजय परीट शासकीय प्रतिनिधी आहेत तर सदस्य सचिव तहसीलदार श्री.श्रीकांत पाटील साहेब आदी योजनेचे कामकाज पाहत आहे.