इंदापूर याठिकाणी सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न- मातंग समाजातील दोन्ही कुटुंबाने फुल्यांचा वारसा जपला.
मातंग समाजामध्ये विचार परिवर्तनाची लाट
इंदापूर तालुका प्रतिनिधी:- चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
इंदापूर या ठिकाणी दिनांक २७मे २०२२ रोजी गुरुकृपा सांस्कृतिक भवन याठिकाणी बामसेफ इंदापूर तालुका प्रभारी संतोष मोहिते गुरुजी यांची कन्या संजीवनी व पांडुरंग खिल्लारे यांचे सुपुत्र मयूर यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुलजी मखरे उपस्थित होते नव दापांत्यांना त्यांनी आशीर्वाद दिले. व परिवर्तनवादी कार्य करणारे मोहिते गुरुजी व त्यांच्या परिवाराचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. रमेश शिंदे यांनी सत्यशोधक विवाह विधी पूर्ण केला यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होतेविवाह सोहळ्याचे व्यवस्थापन राष्ट्रवादी कॉग्रेस इंदापूर शहराध्यक्ष मा. बाळासाहेब ढवळे पाटील यांनी केले होते.