उजनी जलाशयात फक्त ६ टीएमसी जिवंत पाणीसाठा! मृतसाठ्यासह ७० टीएमसी पाणी – अभियंता धीरज साळे यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.१८मे : यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली नाही. तसेच यंदाच्या वर्षी भीषण उन्हाळा असताना देखील उजनी जलाशय मायनस मध्ये गेले नाही. ही विशेष बाब म्हणावी लागेल. कारण अधिकाऱ्यांच्या पूर्व नियोजनामुळे अद्याप धरण प्लस मध्ये आहे.
उजनी धरणात अद्याप जिवंत पाणीसाठा ६ टी एम सी इतका आहे. तसेच मृत साठा धरून उजनी जलाशयात ७०, टी एम सी इतका जलसाठा आहे.
यंदाचा उन्हाळा संपत आला तरी पुणेकर आणि सोलापूरकर आणि इतर जिल्हे यांना उन्हाळ्यात कसल्याच झळा सहन कराव्या लागल्या नाहीत.जरी जलाशयात ७०टीएमसी पाणी असल्याचे दिसत असले तरी १२ टीएमसी गाळच आहे.सिना माढा ,दहिगावमधून उपसा सिंचनातून २९६ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ८८ क्यूसेक, तर मुख्य कॅनॉल ३ हजार १०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.