उजनी जलाशयात विदेशी माशांमुळे स्थानिक माशांच्या प्रजाती नामशेष
विदेशी माशांमुळे स्थानिक माशांच्या प्रजाती नामशेष
चीलापीने व्यापले अखंड उजनी
इंदापूर| प्रतिनिधी| शिवाजी शिंदे |चक्रव्यूह न्यूज नेटवर्क|
इंदापूर ६: प्रचंड प्रदूषण आणि चीलापीसारख्या विदेशी माशांमुळे उजनी जलाशयातील अनेक स्थानिक माशांच्या प्रजाती नामशेष झाल्या आहेत. उजनी जलाशयाच्या परिसरात काही ठिकाणी मांगुराची शेती देखील केली जाते.ब्रिटिश संशोधक फ्रेजर यांनी १८४६ मध्ये अनेक पुणे जिल्ह्यातील अनेक नद्यांचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला होता की” या नद्यांमध्ये ५६ व त्यापेक्षा अधिक स्थानिक माश्यांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत.”
चीलापी हा मासा मूळचा आफ्रिकन मासा असून तो आपल्या देशात चीनमधून आपल्याकडे आला आहे. आणि याच कारणामुळे स्थानिक मासे नामशेष झाले आहेत.
नदीतील पाण्यात जनावरे धुणे, निर्माल्य, प्लास्टिक सांडपाण्याचा प्रवाह यामुळे नदीपात्र दूषित झाले आहे.नदीच्या पात्रात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कारखान्यातील सांडपाणी , मैल्याचे पाणी साचून बेटे तयार झाली आहेत.पाण्यात यामुळे मिथेन गॅस चे प्रमाण वाढून पाण्यातून बुडबुडे येत आहेत.
तसेच कचरा कुजवण्यासाठी पाण्यातील ऑक्सिजन प्रमाण कमी झाले आहे. आणि त्यामुळे याचा परिणाम जलचरांवर झाला आहे. चीलापी हा मासा अतिशय गढूळ आणि प्रदूषित पाण्यात तग धरतात आणि स्थानिक माश्यांचा पाठलाग करून त्यांना नष्ट करतात. तसेच त्यांची अंडी खातात.त्यामुळे या माशांनी स्थानिक सर्व मासे संपुष्टात आणले. आता उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात फक्त आणि फक्त चिलापी उरल्या आहेत.
आता पावसाळा आला आहे. पाऊस पडल्यावर प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रजनन करणारे दुर्मिळ मासे संपल्यात जमा आहेत. वाम, मरळ, राहू, कटला,मिरगन तसेच अनेक माशांच्या प्रजाती नामशेष झाल्या आहेत.विदेशी माशांचे आक्रमण आणि प्रदूषण या कारणांमुळे उजनी जलाशयातील मस्त्यजीवन उद्ध्वस्त झाले आहे.
मांगुर, चिलापी, गप्पी व अनेक विदेशी मासे उजनी जलाशयाच्या पत्रात असण्याची शक्यता आहे.केंद्रीय हरित लवादाने बंदी घातलेल्या मंगुर माश्याचे प्रमाण अन्य ठिकाणी वाढले आहे. तसेच चीलापी, मांगुर मांसभक्षक असल्याने पर्यावरण आणि आरोग्याला घातक आहे.
उजनी पाणलोट क्षेत्राच्या पट्ट्यात नदीपात्रालगत मांगूर व पंकज माश्यांची असंख्य तळी आहेत.ही तळी ही या पाण्यात गडप होतात.परिणामी हे मासे नदीच्या मुख्यप्रवाहात मिसळले जातात.यातील मांगूर हा मासा कमाल गलिच्छ पाण्यात जगतो.सडलेले कश्याचे ही मांस व इतर जातीच्या माश्यांवर गुजराण करतो.त्याच्या तावडीतून वाहून आलेली प्रेते देखील सुटत नाहीत.त्यामुळे मांगूर माश्याच्या पैदाशीवर शासनाने बंदी घातली आहे तरी गुपचूप शेततळी होत राहतात.
सध्या उजनी पाणलोट क्षेत्रात आत्ताच्या परिस्थितीत कश्याबश्या तग धरुन राहिलेल्या नदीतील माश्यांच्या मूळ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. रोहू,मरळ,कटला,वांब,चांभारी हे भीमा नदीतील मूळ मासे आहेत.चिलापीच्या आक्रमणानंतर सर्वाधिक मागणी असणारा वांब मासा नदीतून हद्दपार झाला.तुरळक प्रमाणात तळ्यांमध्येच तो आढळतो आहे. चांभारीची तीच गत झालेली आहे.मागील आठ दहा वर्षांच्या काळात नदीत बीज सोडले गेले नव्हते.रोहू,मरळ,कटला या माश्यांची पैदास त्यामुळे कमीच होती.या पार्श्वभूमीवर माश्यांच्या आडतदारांनी मागील वर्षी रोहू, कटला व कार्प जातीच्या इतर माश्यांची पिल्ले आयात करुन भिगवणपासून माळवाडी पर्यंतच्या नदीपात्रात सोडली होती.ते मासे लहान असतानाच बहुतेक माश्यांची परप्रांतिय मासेमारांनी त्यांची बेकायदा शिकार केली.