देशाचे सर्व्वोच नेते मा. केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची शहा कुटुंबियांना सांत्वनपर भेट.
इंदापूर प्रतिनिधी चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.१९:माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी इंदापूर येथील शहा कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली.
इंदापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष, तथा स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक गोकुळदास (भाई)विठ्ठलदास शहा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दिनांक १० सप्टेंबर रोजी दु:खद निधन झाले होते.
यावेळी मुकुंद शहा, भरत शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, अंगद शहा, हनुमंत कोकाटे, प्रमोद राऊत, सागर पवार आदी उपस्थित होते.