देशाचे स्वातंत्र्य मिळवून देण्यात लहूजींचा सिंहाचा वाटा-मा.सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
शिवाजी शिंदे
प्रतिनिधी : दि.१४ : आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या साजरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी अशी प्रतिज्ञा करणारे क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा यांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मा. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी ते म्हणाले की, देशाचे स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा सिंहाचा वाटा होता. तसेच जेथे जेथे अन्याय होत असेल तेथे अन्याय निवारण करण्याचे काम त्यांनी केले.यावेळी ललेंद्र शिंदे यांचे कार्य फार चांगले असून समाजाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सांगितले.
त्यानंतर प्रदीप गारटकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे म्हणाले की, आद्य क्रांती गुरू लहुजी हे देशासाठी लढणारे व क्रांतिकारक घडवणारे गुरू होते .
त्यामुळे समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा. पुढे या पिढीने त्यांना आदर्श ठेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ललेंद्र शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच आयोजाकांचे आभार मानले.यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भरत शेठ शहा, भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे , आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार बांधवांना सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.तसेच सांयकाळी ७.००वा. महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक सोनू साठे यांचा सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमाचा आनंद नागरिकांनी घेतला.मूकबधीर निवासी शाळा व उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन मातंग एकता आंदोलन व ललेंद्र शिंदे भावी नगरसेवक मित्र मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आयोजक : ललेंद्र शिंदे, सोनू धावरे , भगवान मोरे, अमित मोरे, तुषार ढावरे, अनिकेत सानप, रोहिदास शिंदे, भावी नगरसेवक ललेंद्र शिंदे मित्रपरिवार व तसेच मातंग एकता आंदोलन पदाधिकारी यांनी साठेनगर इंदापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.