पिंपरी बुद्रूक विकास सोसायटीवर भाजपचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी
•पिंपरी बु. विकास सहकारी सोसायटीवर भाजपची सत्ता
•माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच पुणे जिल्हा बँकचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन
पिंपरी बुद्रुक येथील विकास सहकारी सोसायटीवर भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळवित विकास सोसायटीमध्ये सर्वच्या सर्व १३ जागी यश संपादन केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी या विजयी सदस्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पिंपरी बुद्रुक येथील जनतेने विजयी उमेदवारांचे मोठे स्वागत केले.या विकास सोसायटीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी विजयी उमेदवारांना मिळणार असून त्यांनी या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यतत्पर रहावे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.