: पुणे जिल्हा परिषदेच्या ८२ पैकी २२ आणि पंचायत समितीच्या ४४ जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होणार ?
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क शिवाजी शिंदे
दि. २१: पुणे जिल्हा परिषदेच्या ८२ पैकी २२ आणि पंचायत समितीच्या ४४ जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहे. त्याचबरोबर ११ जागा या ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित होऊ शकतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणासह निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे इच्छुक पुन्हा एकदा तयारीला लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच कोणत्या गटासाठी आरक्षण जाहीर होते, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
जुन्या जागांमध्ये सुधारणा केल्याने, आता आणखी सातने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आता ८२ होणार आहे.