प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे तीन दिवसाच्या उपचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
मुंबई: प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला देखील दिला आहे त्यामुळे पुढील तीन दिवस ते रुग्णालयात असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.
या बाबतीत राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे.
दरम्यानच्या काळात ते बारामती येथे दिवाळी पहाट कार्यक्रमात सर्वांना भेटले होते. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचा सोलापूर दौरा होता. तोही रद्द करण्यात आला होता.कारण बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ते येणार हेाते. मात्र, पवारांचा दौरा रद्द झाल्याने बारबोलेंचा पक्षप्रवेश लांबला आहे.