बारामतीत वाघ-सिंह गर्जना करणार! गाडीखेल येथे वाघ – सिंह प्रकल्प होणार! तर उजनी बॅकवॉटर पर्यटन प्रकल्प विकासाला मिळणार चालना!
बारामती प्रतिनिधी चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.११: पुणे जिल्ह्यात आता बिबट्यांसह वाघ सिंहाचे देखील दर्शन होणार आहे. त्यामुळे आता मोठ्या अभयारण्यात जाण्याची गरज नाही.विशेष म्हणजे बारामती तालुक्यातील गाडीखेल ग्रामपंचायत हद्दीत वाघ -सिंह प्रकल्प होणार आहे.
पुणे जिल्हा आता बिबट्यांसह वाघ-सिंहांच्या गर्जनेने गरजनार आहे. बारामती तालुक्यातील गाडीखेल येथे वाघ, सिंह प्रकल्पाच्या प्राथमिक कामांनी वेग घेतला आहे. या प्रकल्पाची जागा निश्चिती झाली आहे. आता मोजणी, प्रकल्प अहवाल, प्रकल्प सल्लागार नियुक्ती, अशी कामे सुरू झाली असून, येत्या एक-दोन वर्षांत हा प्रकल्प आकाराला येईल अशी शक्यता आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.बारामती तालुका यापूर्वीच पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला आहे. या प्रकल्पाबरोबरच शिवसृष्टीचा प्रकल्प आकाराला येत असल्याने बारामती आणि परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.बारामती तालुक्यात या प्रकल्पाबरोबरच शिवसृष्टीचा प्रकल्प आकाराला येत असल्याने बारामती आणि परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामतीत मयूरेश्वर अभयारण्य आहे तसेच लगतच्या इंदापूर तालुक्यात निसर्गरम्य उजनी उजनी बॅक वॉटर परिसर असल्याने या भागातील पर्यटन विकासाला बहर येणार आहे. त्यामुळे उजनी बॅक वॉटर पर्यटन विकास केंद्राला हिरवा सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.