मुस्लिम समाजासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून लागेल तेवढी मदत करणार हर्षवर्धन पाटील यांची ग्वाही

मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांना निवेदन.

इंदापूर, प्रतिनिधी : आज दि.११ रोजी इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजास विविध योजनांच्या माध्यमातून, व्यवसायासाठी अनुदान, व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत, अल्पसंख्यांक समाजासाठी भरघोस विकास निधी मदत मिळण्याबाबत इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर येथे भेट घेत निवेदन दिले.

प्रसंगी निवेदन स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी आपण सदैव प्रयत्नशील असून आजपर्यंत जेवढी शक्य होईल तेवढी मदत आपण केली आहे आणि भविष्यातही अल्पसंख्याक समाजासाठी जेवढी शक्य होईल तेवढी मदत करणार.

   अल्पसंख्यांक समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना केंद्र व राज्य सरकारने सुरू केले आहे या योजनेचा लाभ आपल्या तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाला मिळावा याकरिता राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अल्पसंख्याक मंत्री अब्दुलजी सत्तार यांची भेट घेत प्रयत्न करणार आहोत असे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.

हर्षवर्धनभाऊ पाटील हे सातत्याने मुस्लिम समाजाला विविध माध्यमातून मदत करत असतात. तालुक्यातील शेकडो तरुणांना त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये नोकरी देत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह चालत आहे

                               – सलीम सय्यद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!