राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी खा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील लढण्याची शक्यता? मात्र संभाजी महाराज सहाव्या जागेसाठी शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई, १८ मे : राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे.पण आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही संभाजीराजे यांची  राज्यसभेची वाट आणखी बिकट केली आहे. त्यामुळे भाजपाकडून मा. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे कदाचित त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात लढावे लागेल.

मात्र इकडे संभाजी महाराज सहाव्या जागेसाठी उस्तुक आहेत.त्यांनी आपला मार्ग शिवसेनेच्या दिशेने निवडला आहे.ते कोणत्याही क्षणी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजप राज्यसभेसाठी आपली तिसरी जागा लढण्याची शक्यता आहे. भाजपाकडून राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील, पियूष गोयल, विनोद तावडे, ,धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस निर्माण झाली आहे. भाजपने आता संख्याबळ नसतानाही तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपकडून पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी भाजपला १३मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे.भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपला फक्त १३ मतांची गरज आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत.संभाजी महाराज कोणत्याही क्षणी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती शक्यता आहे. त्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!