राज्यातील २८ जिल्हा परिषदाचे आरक्षण जाहीर

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क मुंबई

दि.३० : निवडणूक आयोगाने राज्यातील २८ जिल्हा परिषदाचे आरक्षण जाहीर केले आहे त्यामुळे लवकर निवडणुका होतील असे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यातील केवळ ९ ठिकाणीच खुल्या गटासाठी आरक्षण पडल्यामुळे इच्छुकांच्या पदरी घनघोर पडली आहे तसेच ११ ठिकाणी महिलासाठी राखीव प्रवर्ग राहिला आहे.  पुढील अध्यादेश केव्हा निघणार? याकडे झेडीपी, पंचायत समितीच्या निवडणुकांकडे नजरा लागल्या आहेत.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव झाले असून या बाबतचे राजपत्र राज्यसरकारने  काल रात्री उशिरा जाहीर केले. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. राज्यात केवळ रत्नागिरी आणि सातारा येथेच ओबीसी महिला आरक्षण पडले आहे.

राज्यातील जिल्हा परिषद व (कंसात) पुढीलप्रमाणे- सर्वसाधरण प्रवर्ग – ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगांव, पुणे, औरंगाबाद, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ. अनुसूचित जमाती प्रवर्ग – पालघर, अहमदनगर, बीड, परभणी, नागपूर, नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) – रत्नागिरी, सातारा. सर्वसाधारण (महिला) – नाशिक, धुळे, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला. नागरिकांचा मागास प्रवर्ग – सोलापूर, जालना, नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!