वीजसेवा खंडित असताना देखील आनंदाच्या शिधेचे स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र जगताप यांच्याकडून सेवा अखंडित.

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

इंदापूर प्रतिनिधी: राज्य सरकारने १००रुपयात आनंदाची शिधा या उपक्रमअंतर्गत गोर गरिबांना किट देऊन दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला.

खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना ही सेवा ऑफलाईन देण्याचा आदेश केला. याच आदेशाचे पालन करत स्वस्त धान्य दुकानदार राजू जगताप यांनी रात्री दहा पर्यंत दुकान चालू ठेवून सामान्य लोकांची आनंदाची शिधा दिली. त्यामुळे गरीब जनसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

रात्री अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने आता आपल्याला किट मिळतेय की नाही ही चिंता होती परंतु श्री. जगताप यांनी ही आपली सेवा मोबाईलची टॉर्च लावून अखंडित ठेवली.रात्री १० वा. पर्यंत सेवा चालू ठेवली.

त्यामुळे मा.नगरसेवक इब्राहिम उर्फ बाबा शेख तसेच अहेमदरजा इकबाल सय्यद (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग इंदापूर) तसेच नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले . जगताप यांचे कार्डधारक व सामान्य जनतेनेअभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!