सामाजिक कार्यकर्ते अमोल कांबळे यांना पितृशोक
इंदापूर प्रतिनिधी / निधन वार्ता /
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.११: इंदापूर शहरातील साठेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल कांबळे – री.पा.ई मातंग आघाडी तालुकाध्यक्ष (आठवले गट)यांचे वडील चंद्रकांत दशरथ कांबळे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चंद्रकांत कांबळे हे अत्यंत मेहनती, कष्टाळू व मनमिळाऊ होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, चार सूना व दहा नातवंडे असा परिवार आहे.