हूर्रे..!!इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन सेवा मिळणार!- राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची माहिती.
इंदापूर रुग्णालयात सिटीस्कॅन सेवा मिळणार!
इंदापूर ता. १९ :इंदापूर तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसर गावातील लोकांना सिटीस्कॅन ५०टक्के दरात मिळणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली त्यामुळे सामान्य नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे महागडी समजली जाणारी ही सेवा ५० टक्के दरात प्राप्त होणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील निवडक सरकारी ३२ रुग्णालयांत सिटीस्कॅन सेवा सेवा बाह्य सेवा पुरवठादारामार्फत उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु आहे.(सेवा कालावधी पुरतीच) देण्यात येणार आहे.या संदर्भात शासनाने जी.आर काढला आहे.
इंदापूर येथे सिटीस्कॅन सेवा सुरु होणार आहे. ५० टक्के सवलतीत रुग्णांना सदर सेवा मिळणार आहे.नियुक्त करण्यात येणारा बाह्यसेवा पुरवठादार रुग्णांना शासनाने ठरवून दिलेल्या अल्पदरात सेवा देणार आहे. परंतु खासगी हॉस्पिटलचे रुग्ण या ठिकाणी तपासणीसाठी घेता येणार नाहीत.
राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना दैंनदिन सिटीस्कॅन सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी इंदापूर तालुक्यातील जनतेने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती. सिटी स्कॅनचा फायदा इंदापुर माळशिरस, माढा या तालुक्यातील रुग्णांना होणार आहे. डॉ. संतोष खामकर, वैद्यकीय अधीक्षक, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडे चौकशी केली असता महितीस दुजोरा मिळाला.