१९९५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयास एक लाख पन्नास हजारांचे शैक्षणिक साहित्य भेट
इंदापूर शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.८:रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयास बारा व्हाईट डिजीटल बोर्ड ,वीस डस्टर व मार्कर पेन असे जवळपास एक लाख पन्नास हजार रुपयांचे साहित्य मुख्याध्यापक भास्कर वाबळे यांचेकडे स्थानिक शालेय समिती सदस्य शहरातील प्रसिद्ध सर्जन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्रेणिक शहा यांचे उपस्थितीत देण्यात आले. दहावी १९९५ चा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संस्थेत मागील महिन्यात नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेला होता.काळाची गरज ओळखून शाळेची शैक्षणिक गरज लक्षात घेता शिक्षकांच्या हातातील खडू बंद होऊन त्याऐवजी डिजीटल पेन वापरला पाहिजे अशी संकल्पना माजी विद्यार्थ्यांकडून मांडली गेली होती.यावेळी दहावी १९९५ माजी विद्यार्थी इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम,प्रा.अमित दुबे, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुहास मोरे, महादेव वाघमोडे, सुनिल जाधव, गोकुळ हराळे,सुनिल बोराटे, राजेश शुक्ल, विशाल ढोकरे, गणेश राऊत, प्रकाश शिंदे यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी डॉ.श्रेणिक शहा, कैलास कदम, भास्कर वाबळे यांची भाषणे झाली.सुत्रसंचालन सुनिल मोहिते यांनी केले,स्वागत मुख्याध्यापक भास्कर वाबळे यांनी तर आभार पर्यवेक्षक विजय शिंदे यांनी मानले.