विकासधारा मंच अंतर्गत बेटी की रोटी हा नविन महिलांसाठी उपक्रम
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२२ शुक्र: विकासधारा मंच अंतर्गत “रोटी की बेटी” हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे विकासधारा मंचच्या अध्यक्षा सौ. सिमा कल्याणकर यांनी सांगितले. तसेच रोटी की बेटी या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.गणेश इंगळे व इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.गणेश इंगळे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी महिला पोलिस कॉन्स्टेबल माधुरी लडकत व अनिता खरात अध्यक्षा तेजपृथ्वी ग्रुप यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले व याचा फायदा महिलांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
विकासधारा मंचच्या अध्यक्षा सौ. सिमा कल्याणकर यांनी ही संकल्पना सर्वांच्या समोर मांडली.ग्रामीण भागातील महिला बचत गट महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे व त्यांच्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून बेटी की रोटी हा उपक्रम राबविला जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.