तब्बल १५वर्षांनंतर इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेत परीवर्तन विजयी पॅनेलचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले अभिनंदन!
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२५ सोमवार :तब्बल १५ वर्षांनंतर इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेत परीवर्तन विजयी पॅनेलचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले अभिनंदन!
सध्या इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला होता.ही निवडणुकी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी होती.स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रणित पॅनेल होता तर शिक्षक विकास पॅनेल हा भाजपा प्रणित होता. परंतु कालच्या निवडणुकीने शिक्षक संघा मधील वातावरणच बदलून गेले. १५ वर्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग सत्ता परिवर्तन करण्यात स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलला यश आले. त्यामुळे निकलाधीच या पॅनेलने विजयाचा जल्लोष केला आणि आनंदाचा गुलाल उधळला. यावेळी राज्यमंत्री श्री. दत्तात्रेय भरणे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
काल रविवार दिनांक २४ एप्रिल रोजी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची निवडणूकीत स्वाभिमानी शिक्षक परिवार पुरस्कृत स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल २१ – ० ने विजयी झाला असून एक आगळे वेगळे आनंदाचे वातावरण विजयी शिक्षक पॅनेल मध्ये पाहायला मिळाले. काळी ८.००ते ४.००पर्यंत मतदान सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय इंदापूर येथे मतदान प्रक्रिया पार पडली. इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या संस्थेत संचालक मंडळाची निवडणूक सन २०२२-२७ या कालावधी साठी झालीआहे.दोन्हीं बाजूकडून एकूण २१-२१असे एकूण ४२ उमेदवार रिंगणात उतरले होते एकूण ९ गटांमध्ये ही निवडणूक लढवली गेली.यामध्ये गट निहाय निकाल पुढीलप्रमाणे
१)इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघात स्वाभिमानी शिक्षक परिवाराकडून श्री किशोर राजाराम वाघ हे लढत होते.तर सुनील नारायण शिंदे हे .इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समिती पुरस्कृत शिक्षक विकास पॅनल कडून लढत होते. एकूण ९४५ मतांपैकी श्री वाघ हे ५१७ मते मिळवून ८९ मतधिक्याने विजयी झाले तर श्री.शिंदे यांना ४२८ मते पडली. तर दोन मते अवैध ठरली.
२)अनुसूचित जाती/जमाती राखीव मतदार संघात स्वाभिमानी शिक्षक परिवाराकडून श्री सुहास नामदेव मोरे हे लढत होते, तर त्यांच्या विरोधात सौ.जयश्री गणपत ओव्हाळ या शिक्षक विकास पॅनल कडून लढत होत्या. ९४५ मतांपैकी श्री.मोरे यांना ५५३ मते मिळाली तर सौ. ओव्हाळ यांना ३९२ मते पडली.या मध्ये श्री.मोरे हे १६१ मतधिक्याने विजयी झाले.
३)भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष प्रवर्ग राखीव मतदार संघात स्वाभिमानी पॅनल कडून श्री. सचिन भानुदास देवडे हे लढत होते,तर त्यांच्या विरोधात भिटे सुभाष बबन हे शिक्षक विकास पॅनल कडून लढत होते.एकूण ९४५ मतांपैकी श्री देवडे यांना ५३८ मते मिळाली तर ४११ मते श्री भिटे यांना मिळाली. श्री. देवडे हे १२७ मतांनी विजयी झाले.
या निवडणुकीत एकूण ५ सर्वसाधारण मतदार संघ होते.
इंदापूर, भिगवण – लोणी देवकर , सणसर- निमसाखर, लासूर्णे- निमगाव केतकी,बावडा – रेडणी असे गट असून गटनिहाय मतदार संघाच्या उमेदवारांना मिळालेले मतदान माहिती पुढील प्रमाणे:
४)इंदापूर मतदार संघातून एकूण ३ उमेदवार उभे होते यामध्ये स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे श्री.प्रशांत रामचंद्र घुले५७०मते, श्री. दत्तात्रय अजिनाथ ठोंबरे यांना ५०९ मते तर श्री. शशिकांत किसन शेंडे यांना ५४० मते प्राप्त झाली त्यांच्या विरोधात असलेल्या शिक्षक विकास पॅनल कडील उमेदवार श्री. सतिश विश्वासराव खटके यांना ३८४ मतेnश्री.लतिफ मंहमद तांबोळी यांना ३७८ इतकी मते प्राप्त झाली.तर श्री.वसंत किसन फलफले ३८० मते प्राप्त झाली या पॅनल मध्ये स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे श्री ठोंबरे ,श्री. घुले व श्री शेंडे भरघोस मतांनी विजयी झाले.
५) भिगवण/लोणी देवकर सर्वसाधारण मतदार संघातून एकूण ८ उमेदवार लढत असून प्रत्येक पॅनेलचे एकूण ४ उमेदवार आपले नशीब अजमावत होते.स्वाभिमानी पॅनल कडून लढतीत श्री.बालाजी श्रावण कलवले यांना ४८० मते, श्री.दराडे सतीश विठ्ठल यांना ५०७ मते तर श्री.भारत तात्याराम बांडे यांना ५४६ मते तर श्री.अनिल उत्तम शिंदे यांना ५४६ यांना मते प्राप्त झाली. त्यांच्या विरोधात विरोधी शिक्षक विकास पॅनलचे हरीश अर्जुन काळेल यांना ३९७ मते,श्री.हनुमंत तुकाराम दराडे यांना ३८२ मते तर श्री.संतोष यांना४१७ मते प्राप्त झाली. या गटात स्वाभिमानी शिक्षक परी वर्तन पॅनलचे श्री. कलवले ,श्री. सतिश दराडे तर श्री.शिंदे विजयी झाले.
६)सणसर – निमसाखर सर्वसाधरण मतदार संघातून एकूण दोन्ही पॅनल चे अधिकृत उमेदवार ६ होते.यापैकी स्वाभिमानी शिक्षक परिवर्तनाचे उमेदवार श्री.संतोष दादाराम गदादे यांना ५२४ मते, श्री.आदिनाथ विठ्ठल धायगुडे यांना ५२६ मते तर श्री. रणवरे शांताराम तुकाराम ४२७ मते मिळाली तर विरोधक म्हणून शिक्षक विकास पॅनल कडून असलेले उमेदवार श्री. संभाजी विठ्ठल काळे यांना ३९९ मते ,श्री रणदिवे सदाशिव सजन यांना ५२३ मते मते तर लालासौ.माणिकराव वणवे यांना ३७४ मते प्राप्त झाली स्वाभिमानी शिक्षक परी वर्तन पॅनलच्या उमेदवारांनी शिक्षक विकास पॅनलच्या उमेदवारांना चितपट केले.
७) लासूर्णे- निमगाव केतकी सर्वसाधारण मतदार संघाचा ७व्या गटामध्ये समावेश होता. या गटातून दोन्ही प्रमुख पॅनलचे अधिकृत उमेदवार ६ होते. यापैकी स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे उमेदवारश्री. सतीश सावळाराम गावडे यांना ५२४ मते,श्री संजय सोपान म्हस्के यांना ५३७ मते तर तिसरे उमेदवार श्री.भाऊसौ. जगन्नाथ वणवे यांना ५०१ मते मिळाली. तर शिक्षक विकास पॅनलचे श्री.बापूराव जगन्नाथ जाधव यांना ४१७ मते,श्री.तुकाराम जगन्नाथ ठोंबरे यांना ३९० मते तर श्री. किरण रामदास म्हेत्रे यांना ३८० मते मिळाली. या पॅनल मध्ये सुध्दा स्वाभिमानी शिक्षक परीवराचेच उमेदवार विजयी झाले.
८) बावडा – रेडणी सर्वसाधारण मतदार संघात स्वाभिमानी शिक्षक परिवाराकडून श्री.तरंगे संतोषकुमार तानाजीराव यांना ५३८ मते,श्री.चव्हाण दत्तात्रय सदाशिव यांना ४८७ मते तर श्री.शिंदे रामचंद्र बलभीम यांना ४६२ मते मिळाली तर शिक्षक विकास पॅनलचे श्री.पराडे विष्णू वामन यांना ३९९ मते, श्री.बागल ज्ञानदेव अर्जुन यांना ४६१ मते तर श्री.वाघमोडे नितीन शिवाजी यांना ४१५ मते प्राप्त झाली . या गटा मध्ये सुद्धा स्वाभीमानी शिक्षक परिवाराचे उमेदवार जास्त मतांनी विजयी झाले.
९) फक्त महिला सदस्य मतदार संघ या शेवटच्या गटामध्ये स्वाभिमानी शिक्षक परी वर्तन गटाकडून सौ. गरगडे संजीवनी उद्धव यांना ५१०मते प्राप्त झाली तर स्वाभिमानी पॅनलच्या सौ.पांढरे संगीता सुरेश यांना ५०३ मते प्राप्त झाली.तर शिक्षक विकास पॅनल कडून श्री.सौ.भगत सुनंदा मोहन यांना ४२९ मते प्राप्त झाली तर शिक्षक विकास पॅनलच्या सौ.भोसले शोभा बापुराव यांना ४१७ मते मिळाली.परंतु या गटामध्ये स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचा विजय झालेला दिसून येतो.
यावेळी स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलचे श्री. नानासाहेब नरुटे यांनी सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभारावर टीका करत म्हणाले की,”इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने सात वर्षामध्ये मनमानी कारभार केला होता.सभासदांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. राज्यात सर्वात निचांकी लाभांश देण्यात आला होता. व्यापारी गाळे आणि कार्यालया संदर्भात प्रचंड आर्थिक अनियमितता दिसून येत होती. उत्पन्नात वाढ होईल असे सांगण्यात आले परंतू आर्थिक अपहाराची गंभीर प्रकरणे सोसायटीमध्ये घडून आलेली होती.सर्व पदाधिकाऱ्यांनी संयमाने प्रचार करत सत्ताधारी संचालक मंडळाचा चुकीचा कारभार सभासदां समोर मांडला त्यामुळेच आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. यावेळी इंदापूर तालुका सह.पतसंस्थेवर स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलचीच सत्ता आल्याचा आनंद व्यक्त करत भविष्यात निर्माण झालेल्या त्रुटी दूर करून शिक्षक संघाचा कारभार स्वाभिमानी शिक्षक परिवाराकडून पार पडला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलचे श्री.सुहास मोरे हे म्हणाले की, गेली सात वर्ष तालुक्याचे लोकप्रतिनिधी ना.दत्तात्रय मामा भरणे यांचा आदर सत्कार केला नाही. केवळ राजकीय आकसापोटी पी.डी.सी बँक ११ % ने सी.सी.देत असताना सत्ताधाऱ्यांनी आठ कोटी रुपये १५ % व्याजाने सीसी इंदापूर अर्बन बँकेकडून कर्ज रूपात का घेतली ? ८ कोटी रुपयांचे ४ टक्के जादा व्याजाचा लाखो रुपये भुर्दंड संस्थेस का केला? या प्रश्नाची उत्तरे देता आली नाहीत. यामुळे विरोधकांचा पराभव झाला.