इंदापूर तालुक्यातील व शहरातील सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने एकत्र राहतात – व्हा. चेअरमन श्री. भरत शहा मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा!
कर्मयोगी व्हा.चेअरमन श्री. भरत शहा यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा!
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.३ मे: इंदापूर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना कर्म योगी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. भरत शहा यांनी ईदच्या मुहूर्तावर सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. भरत शहा म्हणाले की, इंदापूर तालुक्यात व शहरात सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने राहत आहेत.स्वर्गीय शंकर राव भाऊंनी इंदापूर तालुक्यात समतेची बीजे रोवली. कुठलाही धर्मभेद, जातीभेद, निर्माण होऊ दिला नाही. आणि म्हणूनच स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत कुठलाच भेद निर्माण झाली नाही हे या इंदापूरचे वैशिष्ट्य आहे.मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मोठ्या भाऊंचा वसा आणि वारसा तसाच टिकवला आहे.
असे आपले मत व्यक्त केले.यानंतर भाजपा शहराध्यक्ष श्री.शकील सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी युवा नेते अभिजित अवघडे, अल् तक्वा बॉईज व अल् त क्वा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.रफिक (मुन्ना)बागवान हे उपस्थित होते.