भाजपा युवा मोर्चाच्या गाव तिथे शाखा स्थापन करणार- राजवर्धन हर्षवर्धन पाटील
इंदापूर चक्रव्यूह न्यूज नेटवर्क दि.१० : भारतीय जनता पक्ष भाजपा युवा मोर्चाच्या गाव तिथे शाखा स्थापन करणार असल्याची माहिती इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी दिली.
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी जाहीर झाली असून या कार्यकारणीनुसार वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून भाजप पक्षाच्या शाखा विस्तारीकरण मोहिमीची सुरुवात केली जाणार आहे.
राजवर्धन पाटील म्हणाले की,’ भाजप युवा मोर्चाच्या गाव तिथे शाखा स्थापन करणार असून त्यातून युवकांचे संघटन केले जाणार आहे. पक्षाची ध्येय धोरणे, उद्दिष्टे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे.’